यावल प्रतिनिधी । हिन्दवी स्वराज्याचे जनक छत्रपति शिवाजी महाराज यांच्या राज्यअभिषेक दिनाचे औचित्त साधत व कोविड-१९चे पुरेपुर पालन करत तालुक्यातील ग्रामपंचायतीसह इतर ठिकाणी भगवा फडकवून शिवराज्यभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
दरम्यान, कोविड-१९चे नियंत्रण आणि कोरोनाच्या पार्श्वभुमीवर वाढत्या संकटात नागरीकांनी लॉकडाऊन नियमांची काटेकोर अमलंबजावणी व्हावी, याकरीता जनतेच्या संरक्षणा करिता कर्तव्य बजावणारे यावल चोपडा मार्गावरील फॅारेस्ट चौफूली येथे कार्यरत असलेल्या यावल पोलीस स्टेशनचे पोलीस आणी गृहृरक्षकदलाचे कर्मचारी यांना बीएसएफ ग्वालियर येथे तैनात विरावली गावाचे सैनिक महेंद्र पाटील यांचा मुलगा योहित पाटील व सोबत नयन संतोष पाटिल यांचे हस्ते शिवराज्यभिषेकचा आनंद सोहळा फळ आणि मिठाईचे वाटप करण्यात आला.
या प्रसंगी विरावली तालुका यावल या गावातिल राहिवासी मावळे सुनिल पाटील, मोहित पाटील, देवेन्द्र पाटील, बाळा पाटील व रोहीत राजपुत आणि जवान पाटील आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. तसेच महेलखेडी ग्रामपंचायतच्या वतीने कार्यालयावर भगवाध्वज फडकावुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व अभिवादन करत शिवराज्यभिषेक सोहळा सरपंच शरीफा तडवी, उपसरपंच जयश्री महाजन, ग्रामसेवक सोनवणे व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडला.
चुंचाळे तालुका यावल ग्रामपंचायत कार्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन सरपंच सुनंदा पाटील व ग्रामसेवक प्रियंका बाविस्कर यांच्यासह ग्राम पंचायत कर्मचारी मनीष पाटील , ग्रामरोजगार सेवक दिपक कोळी, संगणक परिचालक सुधाकर कोळी, अंगणवाडी सेविका लताबाई कोळी , शाबेरा तडवी , योगीता चौधरी यांच्यासह भुरा पाटील, शाहरूख तडवी , अक्षय पाटील , शकील तडवी आदी ग्रामस्थ यांनी कार्यक्रमास उपस्थित राहुन केले.