जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरासह जिल्ह्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सवास प्रारंभ झाला असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर, यावर्षी प्रत्येक शिवजयंती महोत्सवात प्रारंभी शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. तसेच शिवजयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज शहरातून सकाळपासून भव्य शोभायात्रा निघाली असून यात मोठ्या संख्येने सर्व समाजांमधील आबालवृध्द सहभागी झाले आहेत. तर याचप्रमाणे जिल्ह्यातही ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, आज शहरातील सार्वजनीक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे भव्य मिरवणूक निघाली. यात जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे, आमदार चंदूलाल पटेल, महापौर सीमाताई भोळे यांच्यासह विविध मान्यवर सहभागी झाले. या मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने आबालवृध्द सहभागी झाले आहेत.