Home Cities जळगाव शिवाजी उद्यानाचे सुशोभिकरण करणार – अभिषेक पाटील

शिवाजी उद्यानाचे सुशोभिकरण करणार – अभिषेक पाटील

0
57

abhishek patil 4

जळगाव, प्रतिनिधी |  जळगाव शहर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व मित्रपक्ष महाआघाडीचे अधिकृत उमेदवार अभिषेक पाटील यांनी शहराच्या सुशोभीकरणासाठी विविध कामांना प्राधान्य देणार असल्याचे आज (दि.१७)रोजी  शहरातील नागरिकांशी बोलतांंना सांगितले.

महाघाडीचे अभिषेक पाटील यांनी मेहरूण तलाव लगत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे सुशोभीकरण करणार असे प्रतिपादन केले आहे. हे उद्यान बकाल झाले आहे. शहराच्या सौदर्यात भर टाकण्यासाठी उद्यानाची गरज असून छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. जळगाव शहराचा विकास आणि प्रगती हेच आपले ध्येय असल्याचे पाटील यांनी पुढे सांगितले आहे.


Protected Content

Play sound