मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदींशी केलेली तुलना म्हणजे शिवाजी महाराजांचा सन्मानच समजायला हवा’, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन राजकारण चांगलेच तापलेले असताना भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी कार्यकर्ता बैठकीत हे वक्तव्य केले. आज के शिवाजी- नरेंद्र मोदी या पुस्तकावरुन निर्माण झालेल्या वादावर बोलत असताना हळवणकरने मोदी आणि शिवाजी महाराजांच्या कामात साम्य असल्याचा दावा केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात काही गैर नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानच आहे. पुस्तकाच्या लेखकाचे मी समर्थन करतो’, असे हळवणकर म्हणाले. भाजप नेत्यांनी या पुस्तकाशी भाजपचा कोणताही संबंध नास्लायचे म्हटले आहे. पण हळवणकर यांच्या वादग्रस्त विधानामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.