चाळीसगाव प्रतिनिधी । येथील संभाजी सेनेकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा, यासाठी अधिकृत मार्गाने तसेच अनेकविध उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येत आहेत, मात्र शिवाजी महाराज पुतळ्याच्या विषय मार्गी लागत नसल्यामुळे सेनेने १९ फेब्रुवारी २०२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करा, अन्यथा आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा अधिका-यांना देण्यात आला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याबाबत मागील काळात नगरपरिषदेने पुतळ्यासाठी निविदा काढली होती. औरंगाबादच्या ठेकेदाराला पुतळा बनविण्याचे कामही देण्यात आले होते. परंतु या ठेकेदाराने वेळेत क्ले मॉडेल दिले नाही. तसेच कोणत्याही शर्ती अटींचे पालन केले नाही. त्यामुळे पुतळ्याचा विषय लांबणीवर पडल्यामुळे नगरपरिषदेला पुन्हा निविदा काढावी लागली. म्हणून संभाजी सेनेने नगरपरिषदेला ताकीद वजा दम भरला आहे की, आता ज्या ठेकेदाराला काम दिले जाईल त्याला पूर्णपणे कायदेशीर रित्या बांधून घ्यावे, जेणेकरून अगोदरच्या ठेकेदार याप्रमाणे पुनरावृत्ती होणार नाही. आणि पुतळ्याचे काम लांबणीवर पडणार नाही, अशा आशयाचे निवेदन संभाजी सेनेच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले होते.
यांना दिले निवेदनाचे प्रत
दि. १९ फेब्रुवारी २०२० पर्यंत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण न झाल्यास शिवरायांच्या पुतळ्याची नियोजित जागेच्या त्रिकोणात १२१ संभाजी सैनिक आत्मदहन करतील, प्रसंगी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीत सर्वस्वी शासन आणि प्रशासनच जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, असे निवेदचे प्रति मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र, मा.पालकमंत्री जळगाव, जिल्हाधिकारी जळगाव, पोलीस अधीक्षक जळगाव, अप्पर पोलिस अधीक्षक चाळीसगाव, उपविभागीय पोलिस अधिकारी चाळीसगाव, उपविभागीय अधिकारी चाळीसगाव, तहसीलदार चाळीसगाव, शहर पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन चाळीसगाव यांना देण्यात आले होते.
यांनी केल्या सह्या
निवेदनावर लक्ष्मण शिरसाठ, गिरीश पाटील, सुनील पाटील, अविनाश काकडे, सुरेश तिरमली, दिवाकर महाले, ज्ञानेश्वर पगारे, सुरेश पाटील, विजय देशमुख्य, अमर भोई, भैया देशमुख, नामदेव पाटील, अमोल पाटील, अरमान खाटीक, स्वप्नील महाजन, प्रमोद महाजन आणि आदींच्या सह्या आहेत.