शिवतीर्थ आणि दसरा मेळावा शिवसेनेचाच : जामनेर व पहुर येथे आनंदोत्सव

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  मुंबई महापालिकेनं ठाकरेंना दसरा मेळाव्यास परवानगी नाकारल्याचा आदेश उच्च न्यायालयानं रद्द ठरवून उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. या निकालाचा जामनेर व पहुर येथे आनंदोत्सव साजरा करून स्वागत करण्यात आले

 

आज शुक्रवार दि. २३ सप्टेंबर रोजी न्यायालयाकडून निकाल आला की शिवतीर्थ मैदानावर दसरा मेळावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच होईल. हा निकाल येताच जामनेर तालुका शिवसेना पक्षाने जामनेर येथील नगरपालिका चौकात आणि पहुर येथील बसस्थानक परिसरात फटाके फोडुन आणि मिठाईभरवत आनंदोत्सव साजरा केला.

प्रसंगी युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी विश्वजित मनोहर पाटील,तालुका युवा अधिकारी विशाल लामखेडे, शिवसेना जामनेर शहर प्रमुख ज्ञानेश्वर जंजाळ, उपतालुकाप्रमुख अशोक जाधव, उपतालुका संघटक सुधाकर सराफ,उपशहर प्रमुख दिपक माळी,पहुर शहर प्रमुख संजय तायडे,मयुर पाटील,आनस खान, गणेश पाटील,सुकलाल बारी,आनिल पाटील,अमोल राजपूत,ईश्वर चोरडीया,भाऊराव गोंधनखेडे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

 

Protected Content