जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मुंबईतील पत्री चाळ घोटाळा प्रकरणात ईडी विभागाने आज दुपारी अटक केली आहे. ईडीने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ शिवसेना महानगरच्या वतीने जळगाव महापालिकेसमोर काळ्या फिती लावून जोरदार निदर्शने करण्यात आले.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना रविवार, दि. ३१ जुलै रोजी दुपारी ईडीने चौकशीनंतर ताब्यात घेतले. त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेण्यात आले. आज सकाळीच ईडीचं पथक संजय राऊतांच्या घरी पोहचले होते. त्यांची चौकशी सुरू झाली होती, अखेर ईडीचे अधिकारी राऊतांना ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात गेले. या कारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.
जळगाव शिवसेना महानगरच्या वतीने महापालिकेसमोर जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकानी काळ्या फिती लावून ‘ईडी आणि केंद्र सरकार‘च्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख श्याम तायडे, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह महिला, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.