मुक्ताईनगर प्रतिनिधी । नवनिर्मित नगरपंचायतीतर्फे शहर विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त झाला असून या निधी अंतर्गत जुनेगावातील नागेश्वर मंदिरासमोरील मोठ्या पटांगणात सभामंडप उभारण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेतर्फे नुकतेच पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, नागेश्वर मंदिरासमोरील मोठ्या पटांगणात सभामंडप उभारण्यात यावा, जेणेकरून या ठिकाणी होणारे भागवत सप्ताह, सार्वजनिक मानाचे कार्यक्रम तसेच जुनेगावातील गोरगरीब जनतेचे लग्नकार्य किंवा तत्सम समारोह पार पडणे सोपे होईल याकरिता येथे मोठ्या आकाराचा सभामंडप उभारण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेतर्फे पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. याप्रसंगी उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, शहर प्रमुख गणेश टोंगे, दीपक कांडेलकर(माजी ग्रामपंचायत सदस्य), देवानंद वंजारी, कैलास वंजारी, गणेश कोळी, (पेंटर), दीपक पढार, कैलास शिर्के, कडू गावंडे, रमेश मराठे, संजय कोळी, के.पी.मिस्त्री, राजेंद्र कापसे(माजी ग्रामपंचायत सदस्य), संतोष माळी, पप्पू मराठे, योगेश काळे, अमोल पालवे, प्रशांत भोलाने, गोलू कोळी, दिनेश कोळी, प्रदीप सोनार, दिगंबर चव्हाण, शुभम शर्मा, मनोज मराठे आदी उपस्थित होते.