यावल प्रतिनिधी- केंद्र सरकारने नुकत्याच संमत केलेल्या शेतकरी व कामगार विरोधी कायद्यांच्या निषेधसाठी शिवसेनेतर्फे 10 नोव्हेंबर रोजी भव्य बाईक रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती आज जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांनी येथील कार्यक्रमात दिली.
केंद्र शासनाने बहुमताच्या जोरावर संसदेत नुकतेच मंजूर केलेले कृषी विधयेक व कामगार विधेयक शेतक-यांच्या व कामगाराच्या हिताच नसून शेतकरी-कामगार विरोधी असल्याचे मत जिल्हा शिवेसेना प्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या सभागृहात व्यक्त केले. ते तालुका शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते. त्या विधयेकाच्या विरोधात जळगाव जिल्हा शिवसेनेकडून येत्या १० नोव्हेंबरला जिल्हा शासन दरबारी शिवेसना स्टाईलने मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे असे ते म्हणाले,.
केंद्र शासनाच्या अनेक योजनांचा लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहचत नसल्याचे आमदार पाटील यांनी सांगून कृषी विधेयक व कामगार विधेयक हे शेतकरी व कामगार विरोधी असल्याचे सांगीतले तसेच पदाधिकारी व शिवसैनिकांनी समाजातील सर्वसामान्य गरजू लाभार्थ्यांची कामे करावी सद्य शासनात सेनेचा सहभाग असून पालकमंत्री सेनेचे आहेत असे असतांना जर कोणी पदाधिकारी कामे करीत नसतील तर त्यांनी स्वत:हुन बाजुला व्हावे व ख-या कार्यकत्यांना संधी द्यावी असेही त्यांनी शिवसैनिकांना सुचना दिल्यात. या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद महाजन, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक दिपक बेहेडे, ताुलका प्रमुख रविंद्र सोनवणे, शहरप्रमुख जगदिश कवडीवाले, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक भानुदास चोपडे, महीला प्रमुख रजनी चौधरी, शरद कोळी, संतोष धोबी, कडू पाटील पप्पु जोशी , सपना घाडगे यांचेसह तालुक्यातील शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थीत होते.