जळगाव, प्रतिनिधी | शिवसेना महानगरतर्फे गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले. सालाबादप्रमाणे शिवसेनेतर्फे गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणूकीचे घाणेकर चौकात स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांंनी मिरवणूकीत ढोल ताशाच्या गजरात ठेका धरला होता.
याप्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, उपनगराध्यक्ष मानसिंग , जि. प. सदस्य पवन सोनवणे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महापौर तथा नगसेवक विष्णू भंगाळे, अल्पसंख्याक महानगर प्रमुख जाकीर पठाण, पूनम राजपूत, प्रशांत सुरडकर, किशोर भोसले, विशाल निकम, सार्वजनिक गणेश महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, महिला महानगराध्यक्ष शोभा चौधरी, महिला शहर प्रमुख ज्योती शिंदे, मनीषा पाटील, निलु इंगळे, निर्मला चौधरी,राजू अडवाणी, माजी नगरसेवक जितु मुंदडा आदी उपस्थित होते.