शिवसेना उबाठा पक्षाचे नवे गीत रिलीज

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आगामी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे. या निवडणूकीसाठी मशाल चिन्हाचा उल्लेख असलेले नवे प्रचारगीत जारी करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी हा सोहळा झाला. ज्येष्ठ लेखक, गीतकार श्रीरंग गोडबोले यांनी हे गीत लिहिले असून राहुल रानडे यांनी संगीत दिले आहे. नंदेश उमप यांनी आपल्या पहाडी आवाजात हे गीत गायले आहे.

घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर आज ३ ऑक्टोबर रोजी हे प्रचारगीत रिलीज झाले. ‘पारंपरिक गोंधळ प्रकारातलं हे गीत असून या माध्यमातून आई जगदंबेला आम्ही साकडे घालत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे गीत पोहोचवण्याचं आवाहन जनतेला केले.

Protected Content