धान्य वाटपातील घोळ रोखावा : शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पुरवठा विभागामार्फत करण्यात येणार्‍या धान्य वाटपातील घोळ रोखण्यात यावा या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, पुरवठा विभागाने नेमून दिलेल्या स्वस्त धान्य दुकानदारांकडून लाभार्थ्यांना ठरवून दिलेल्या वेळेनुसार होणार्‍या धान्य वाटपात वारंवार बायोमेट्रिक व इतर कारणांवरून लाभार्थ्यांना धान्य मिळत नाही. तसेच धान्य वाटपासाठी दुकानदारांना गोडाऊन मधून झालेल्या धान्य नियतनाची वारंवारिता जर जवळच्या तारखे मध्ये असल्यास किंवा दोन नियतने एकाच महिन्यात दुकानदारांना दिले गेल्यास तर स्वार्थ हेतूने लाभार्थ्यांपासून गुपित राखून दोनदा शासनाकडून मिळणारे धान्य लाभापासून लाभार्थ्यांला काही धान्य दुकानदारांकडून वंचित ठेवले जाते. अशा तक्रारी बर्‍याचश्या गावांमधून लाभार्थ्यांकडून शिवसेना पदाधिकारी तसेच आमदार कार्यालयामध्ये प्राप्त होत आहेत.

या पअकारामुळे शासनासह लाभार्थ्यांचे नुकसान होते. सदर बाबी टाळण्यासाठी प्रशासनाकडून व लोकप्रतिनिधींकडून लोक हिताचे काम व्हावे यासाठी मुक्ताईनगर विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व शिवसैनिक पदाधिकारी यांनी मुक्ताईनगर तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले आहे.

तालुक्यातील प्रत्येक गावात धान्य वाटप करताना प्रशासकीय यंत्रणा सक्षम करून महसुली अधिकारी नेमून सदर धान्य वाटप लाभार्थ्याच्या दृष्टीने सक्षम करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदन हे मुक्ताईनगर तहसीलचे नायब तहसीलदार निकेतन वाळे यांना देण्यात आले. निवेदन देते वेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख राजेंद्र तळले, विभाग प्रमुख महेंद्र मोंढाळे, शहर प्रमुख गणेश टोंगे, वसंत भलभले,निलेश मेढे, सचिन भोई,शंकर कोळी, अमोल कांडेलकर,वनील कोळी, गौरव काळे,भूषण पाटील, रितेश लष्करे, रितेश सोनार,संचालाल वाघ, उमेश पाटील, इमरान खान, शुभम शर्मा व आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित उपस्थित होते.

Protected Content