मुंबई वृत्तसंस्था । नागपुर येथील महापौर संदीप जोशी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटनेला आज तिसऱ्या दिवस असून मुंबईतील शिवसेनेचे विक्रोळीतील उपविभागप्रमुख शेखर जाधव यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात जाधव गंभीर जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेनेचे उपविभागप्रमुख शेखर जाधव हे गुरूवारी सकाळी मुलासह साई मंदिरात दर्शनासाठी आले होते. याचवेळी एकानं त्यांच्यावर तीन राऊंड फायर केले. यात एक गोळी शेखर जाधव यांना लागली. या गोळीबारात जाधव हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी गोळीबार करणाऱ्या नागरिकाला पकडून ठेवले. दरम्यान, पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतलं. पिस्तुल जप्त करण्यात आलं असून, पुढील चौकशी सुरू केली आहे. शेखर जाधव यांना तीन महिन्यांपासून जिवे मारण्याच्या धमक्या येत होत्या, अशी माहिती आता समोर येत आहे. विक्रोळीत शिवसेनेचं प्रस्थ असून, गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे.