भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शिवसेनेच्या वतीने पुरग्रस्त आपत्तीच्या काळात मदत होण्यासाठी शहरातील विविध भागात जावून निधी संकलान मोहिम राबविण्यात आले. या उपक्रमात मिळालेले धनादेश भुसावळ तहसीलदारांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. अशा परिस्थितीत आपण समाजाचे काही देणे लागतो या हेतूने भुसावळ शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून निधी संकलनासाठी सुरूवात केली. शहरातील स्टेशन रोड, मॉडर्न रोड, सराफ बाजार, वसंत टॉकीज रोड, गांधी पुतळा पर्यंत निधीसंकलन करण्यात आले. यात दुकानदार, हातगाडी आणि नागरीकांकडून आलेले धनादेश भुसावळ तहसीलदारांकडू जमा करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख जगदीश कापडे, शहरप्रमुख निलेश महाजन, शेख ईल्यास, नगरसेवक मुकेश गुंजाळ, उपशहर प्रमुख राकेश खरारे, शिवसैनिक व शिवभोजन केंद्र संचालक उमाकांत शर्मा (नमा), विभाग प्रमुख अरुण साळुंखे, शिवसैनिक जाकीर पेंटर, धीरज वाढोणकर, शिवाजी दाभाडे अशोकराव हिंगणे, समीर तडवी यांच्यासह आदी शिवसैनिक उपस्थित होते.