जामनेर प्रतिनिधी । इंधन दरवाढी विरोधात केंद्र सरकारचा तिव्र निषेध नोंदवित गेल्या एक महिन्यात पेट्रोल डिझेलच्या दरात तब्बल अकरा वेळा दरवाढ झालेली असून ही दरवाढ सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडीत आहे. कोरोनाच्या संकट काळात सर्व सामान्य या दरवाढीमुळे हैराण झाले आहे. या इंधन दरवाढी विरोधात केंद्र सरकारचा जाहिर निषेध नोंदवीत जामनेर नगरपरिषद समोर केंद्र सरकारच्या निषेधार्त घोषणा देत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
इंधन दरवाढी विरोधातील निवेदन तहसीलदार अरुण शेवाळे याना देण्यात आले या वेळी उपजिल्हाप्रमुख डॉ. मनोहर पाटील ,युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील ,शहर प्रमुख अतुल सोनवणे ,ज्ञानेश्वर जंजाळ ,दीपक माळी यांनी केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या या वेळी उप जिल्हा प्रमुख डॉ. मनोहर पाटील,सुधाकर सराफ शहर प्रमुख अतुल सोनवणे, नानाभाऊ जंजाळ, प्रमुख सुरेश चव्हाण, अँड भरत पवार ,भूषण ललवाणी, कैलास माळी, दिपक माळी, व महिला तालुका संघटक मिना शिंदे आदी हजर होते. पोलिस प्रशासनाकडुन चोख बंदोबस्त ठेवला.