Home धर्म-समाज मुक्ताईनगरात शिवसेनेतर्फे महागाई विरोधात निदर्शने

मुक्ताईनगरात शिवसेनेतर्फे महागाई विरोधात निदर्शने

0
71

मुक्ताईनगर प्रतिनिधी । कच्च्या तेलाचे भाव कमी असून सुद्धा केंद्र सरकारने दिवसागणिक भाव वाढवणे सुरू ठेवले आहे. त्याच्या विरोधात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानापासून प्रवर्तन चौकात मोर्चा काढून निदर्शने करण्यात आले. 

तसेच प्रवर्तन चौकात महिला आघाडीच्या महिलांनी रस्त्यावर चूल पेटवून अनोख्या प्रकारे निषेध केला तर शिवसैनिकांनी मोटरसायकली ढकलत ढकलत नेऊन चौकात आणले त्या प्रसंगी स्वतः आमदार चंद्रकांत पाटील आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound