

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव ग्रामीण मतदार संघातील शिवसेना-भाजपा व मित्रपक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रचारासाठी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ हे सरसावले आहेत. धरणगाव शहर व तालुक्यात ते पदाधिकारी व शिवसैनिकांसह पायी फिरून परिसर पिंजुन काढत आहेत.

मतदार संघात विविध विकासकामे करणाऱ्या व सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या राज्यमंत्री ना. पाटील यांना मताधिक्य देऊन विकासाची गंगा कायम ठेवावी, असे आवाहन गुलाबराव वाघ यांनी आज (दि.११) धरणगाव शहरातील प्रचार रॅलीत मतदारांशी सवांद साधतांना केले.
या रॅलीला धरणी चौकापासून सुरुवात करण्यात आली, ही प्रचार रॅली धरणी चौक, जैन गल्ली, भाटिया गल्ली, कदर गल्ली, लांडगे गल्ली, परिहार चौक, गुजराथी गल्ली, मातोश्री कॉम्प्लेक्समार्गे कोट बाजार या ठिकाणी समाप्त झाली. या रॅलीत मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी प्रचार रॅलीला माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ, प्रभारी नगराध्यक्ष अंजली विसावे, गटनेते पप्पू भावे, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, महिला तालुका प्रमुख अश्विनी भाटिया सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


