मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरची चाके चिखलात रुतली ; थोडक्यात अपघात टळला

devendra fadnavis cm 696x348

 

पेण (वृत्तसंस्था) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचे चाके चिखलात रुतल्यामुळे अपघात होता होता थोडक्यात टळला आहे. हॅलिपॅडवरील मातीत हॅलिकॉप्टरची चाके रुतल्याने पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले होते. परंतु, सुदैवाने पायलटने वेळीच प्रसगांवधान दाखवल्याने पुढील अनर्थ टळला.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज रायगड जिल्ह्यातील पेण येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. पेणमध्ये पोहोचल्यानंतर ते प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी रवाना झाले. पेण-बोरगाव येथील हेलिपॅड चिखलासारखे झाले होते. दुपारी साडेचारच्या सुमारास सात टन वजनाचे हेलिकॉप्टर लँड झाल्याने त्याची चाके मातीत रुतली. या परिसरात आधीच पाऊस झाल्याने या ठिकाणी चिखल झाला होता. चिखलात चाके रुतल्याने पायलटचे हेलिकॉप्टरवरचे नियंत्रण मिळवण्यात पायलटला अडचण आली. पायलटचे नियंत्रण सुटणार होते. परंतु, पायलटने वेळीच प्रसगांवधान दाखवल्याने पुढील अनर्थ टळला. या हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचा पीए, एक इंजिनिअर, एक पायलट आणि को-पायलट असे पाचजण बसलेले होते.

Protected Content