मुंबई प्रतिनिधी । राज्यात सत्तासंघर्षाचा पेच सुरू असताना आता उद्या शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. उद्या सकाळी 11 वाजता ही बैठक मातोश्रीवर होणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे हे सर्व आमदारांची मतं जाणून घेणार असून अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
राज्यातला सत्तासंघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचलाय. सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेची मुदत 8 नोव्हेंबरच्या रात्री संपणार आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस सत्तास्थापनेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. भाजपने योग्य वाटा दिला नाही तर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जायचं का असा शिवसेनेसमोर महत्त्वाचा प्रश्न आहे. शेवटच्या क्षणापर्यंत भाजपवर दबाव आणून शक्मय तेवढं जास्त मिळविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.