फोडाफोडी करणाऱ्यांना शिवसेनेचा कडक इशारा

jalgaon Shivsena

मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या अनेक दिवसांपासून मालाडच्या रिट्रीट हॉटेलात मुक्कामी असलेल्या शिवसेना आमदारांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपापल्या मतदारसंघात परतण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे काल रात्रीपासून आमदार परतायला सुरुवात झाली आहे. परंतू यावेळी फोडाफोडी करणाऱ्यांना कडक इशाराही देण्यात आला आहे.  आमदार फोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचेच डोके फुटेल, असा कडक इशारा शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी दिला आहे.

 

‘द रिट्रीट’ हॉटेलमधून आपल्या मतदारसंघात परत जाताना शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे दिलीप लांडे यांनी आमदार फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना इशारा दिला आहे. शिवसेनेचा आमदार फोडणे तसे शक्य नाही. पण जर कोणी आमदार फोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचेच डोके फुटेल, असे वक्तव्य दिलीप लांडे यांनी केले आहे. सत्ता संघर्ष पेटल्यानंतर आमदार फुटीच्या भीतीने शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मालाडच्या रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवले होते. तर काँग्रेसचे आमदार जयपूरमध्ये आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मालाडच्या रिट्रीट हॉटेलात मुक्कामी असलेल्या शिवसेना आमदारांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपापल्या मतदारसंघात परतण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे काल रात्रीपासून आमदार परतायला सुरुवात झाली आहे. तरी, या आमदारांना 17 नोव्हेंबरला म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीला त्यांच्या स्मृतिस्थळावर हजर राहण्यास सांगितलं आहे.

Protected Content