पुणे प्रतिनिधी । शिवसेनेच्या आमदारांमध्ये वैचारिक नीतीमत्ता उरलेली नाही. पैसे देऊन आमदार, महापौर, नगरसेवक होत असल्याचं शिवसैनिकांनाही माहित आहे. त्यामुळे शिवसेनेचा वाघ आता राहिलेला नसून, तो शेळ्या-मेंढ्या झाला असल्याची टिका राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी येथे आयोजित सातव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये ‘युवर्स ट्राली नारायण राणे’ कार्यक्रमात केली.
खा. राणे पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे होते, तोपर्यंतच शिवसेना हा शिवसेना होता. तसेच त्यांनी शिवसेनेशी आलेला संबंध, राजकारणातील प्रवेश, बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतची पहिली भेट, कौटुंबिक पार्श्वभूमी, बेस्टचे अध्यक्ष म्हणून केलेले काम, मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द, शिवसेनेला दिलेली सोडचिठ्ठी, अशा विविध विषयांवर दिलखुलास भाष्य करत अनेक गौप्यस्फोट केले. याचबरोबर, भाजप प्रवेशासाठी शिवसेनाच आडकाठी आणत आहे, असा आरोपही त्यांनी केला.