जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल लेवा सभागृहात बुधवारी १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या महिला आघाडीची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी मुंबईल महापालिकेच्या शिक्षण सभापती तथा महीला आघाडीच्या संपर्क प्रमुख अंजली नाईक यांनी उपस्थित महिला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
शिवसेना महिला आघाडीच्या नवीन संपर्क प्रमुख अंजली नाईक या जळगाव दौऱ्यावर आहेत. बुधवारी १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शहरातील सरदार वल्लभभाई पटेल लेवा सभागृहात अंजली नाईक यांनी मार्गदर्शन केले. यात शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणे महीला सक्षमीकरण व रोजगार यासह विविध विषयावर मार्गदर्शन केले. जळगाव शहर जळगाव ग्रामीण, धरणगाव, एरंडोल, पारोळा, अमळनेर येथील महिला बैठकीला उपस्थित होत्या. या बैठकीत विविध स्तरातील महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला.
याप्रसंगी व्यासपीठावर महापौर जयश्री महाजन शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, महीला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी, माजी नगराध्यक्ष उषा वाघ, तालुका प्रमुख उमेश पाटील आदी उपस्थित होते. या बैठकीत महापौर जयश्री महाजन, निलेश चौधरी, गुलाबराव वाघ अंजली नाईक आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम राजपूत व गायत्री सोनवणे यांनी तर प्रास्ताविक जिल्हाप्रमुख महानंदा पाटील यांनी केले व आभार मनीशा पाटील यांनी मानले