मुंबई (वृत्तसंस्था) कॉंग्रेसने बाहेरून पाठींबा देण्यास तयार झाल्यानंतर शिवसेनेचे नेते राजभवनात दाखल झाले आहेत.
राज्यात सत्ता स्थापनेवरून दिवसभर चर्चेनंतर अखेर कॉंग्रेसने शिवसेनेला बाहेरून पाठींबा दिला आहे. राजभवनात दाखल झालेल्या या नेत्यांमध्ये युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. त्यामुळे, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापित करेल हे आता स्पष्ट झाले आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सकाळपासून दोन महत्वपूर्ण बैठका घेतल्या. या बैठकीनंतर शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ताज लँड एंड्स हॉटेलमध्ये शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी फोनवर बातचीत करून अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली होती.