मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून जर भाजपला सरकार स्थापन करता आले नाही, तर शिवसेना मात्र, सरकार स्थापन करेल. शिवसेना सत्तेपासून केवळ एक पाऊल दूर असून, आमच्याकडे शिवसेनेला पाठिंबा देणारी पत्र आहेत,” असा खळबळजनक दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खासदार संजय राऊत यांनी काही धक्कादायक दावे केले आहेत. राऊत म्हणाले, भाजपाला सरकार स्थापन करणे जमले नाही, तर शिवसेना १४५ चा जादूई आकडा सिद्ध करून दाखवू शकते. शिवसेनेची सरकार बनवण्याची पूर्ण तयारी झाली आहे. शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देणाऱ्या नेत्यांची पत्र आमच्याकडे आहेत. भाजपा सरकार स्थापन करण्यास अपयशी ठरल्यानंतर आम्ही राज्यपालांची भेट घेऊ आणि पाठिंब्यांची पत्र दाखवू,” असा दावा राऊत यांनी या मुलाखतीत केला आहे.