शिवसेनेने स्वाभिमानाने निर्णय घेतलाय, त्यामुळे माघार नाहीच : संजय राऊत

sanjay raut 3
मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदी शिवसेनेचाच उमेदवार विराजमान होईल. येत्या दोन दिवसांमध्ये राज्यातील चित्र स्पष्ट होईल. आता दुसऱ्या कोणी मुख्यमंत्रिपद काय तर इंद्रपद दिले तरी माघार घेणार नाही, अशी कठोर भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडली. शिवसेनेने स्वाभिमानाने घेतलेला हा निर्णय असल्याचे ते म्हणाले.

 

राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनीच राज्याचे नेतृत्व करावे अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. दिल्ली आणि राज्यात बसून महाराष्ट्राची कुंडली बदलण्याचा अनेकांनी विचार केला होता. मात्र हा छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांचा महाराष्ट्र आहे. कुणीही या राज्याची कुंडली बदलू शकत नाही. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या मातीतील नेते आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण आणि सामाजिक कार्य दोन्हीही केल्याचे संजय राऊत म्हणाले. भाजपला दूर ठेवून राज्यात सत्ता स्थापन करण्यावर शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये एकमत झाले आहे. तिन्ही पक्षाच्या सत्तावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला असून आज नवी आघाडी सरकार स्थापनेचा दावा करणार आहे.

Protected Content