धरणगाव प्रतिनिधी । माध्यमिक शालांत दहावीचा निकाल नुकताच लागला असून परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवसेना शहर शाखेतर्फे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
कायक्रमास प्रमुख अतिथी म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील, चर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, गटनेते पप्पु भावे, शिवसेना उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, उपनगराध्यक्ष विलास महाजन आदि उपस्थित होते.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ यांनी आपले मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांना आपण जे यश संपादन केले आहे. दहावी नंतर पुढील करिअर कसे घडवण्यासाठी दहावीचा हा पाया असून आपल्यातील कलागुण जे असतील त्याच्या जोरावर आपण पुढील वाटचाल व योग्य मार्ग निवडून स्पर्धा परीक्षेच्या युगात यश संपादन करा. जो वाचेल तोच स्पर्धेत टिकेल असे मत व्यक्त केले. नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी गुणवंत व यशवंत होऊन शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. “आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही राज्य करू शकता.” असे मत व्यक्त केले. तर भानुदास विसावे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पी.आर.हायस्कूल मधून दहावी प्रथम आलेली विद्यार्थींनी विशाखा विजय महाजन ९६.२० टक्के, बालकवी ठोबरे व सराजाई विद्यालयातून प्रथम मधु धनराज चव्हाण ९६ टक्के, इंदीरा कन्या विद्यालयातुन प्रथम काजल नरेश भोई, उर्दू हायस्कूल मधून प्रथम ९५टक्के, अताऊल मुस्तुफा इलायस हुसेन, महात्मा फुले हायस्कूल मधून प्रथम ९१.४०टक्के, रोहित मनोज पटूने, ८८टक्के, श्रद्धा ज्ञानेश्वर पाटील यांच्या सत्कार करण्यात आला तर बालकवी, पी. आर. हायस्कूल, महात्मा फुले इंदिरा कन्या, उर्दू हायस्कूल मधून द्वितीय, तृतीय विद्यार्थी पुढील प्रमाणे विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात ८८टक्के तर द्वितीय विद्यार्थी वैष्णवी जयदेव चौक, स्नेहा संजय मराठे, माधुरी आफ्रे, भाग्यश्री योगेश पाटील, काजल संतोष बिचवे, कोमल ताराचंद चौधरी, वेदांत प्रमोद पाटील, चेतना संजय पाटील, ईश्वर रामदास कुंभार, वैशाली हरी देशमुख, शेख निदा आ.मो.रहिस, मोरेन नवाब, शुभांगी सुरेश महाजन, निकिता सुभाष महाजन, संजना बापू पाटील, प्रसाद नारायण चौटे, दिपश्री हेमंत चौधरी, तावडे अभिषेक अनिल, धनश्री सुनील पवार, ओम विनोद गुजर आदि विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी उपस्थित गुलाबराव वाघ (शिवसेना जिल्हाप्रमुख), पि.एम.पाटिल (शिवसेना उपजिल्हाप्रमुख), निलेश चौधरी (लोकनियुक्त नगराध्यक्ष), विलास महाजन (उपनगराध्यक्ष), भानुदास विसावे, (राष्ट्रीय चर्मकार कार्याध्यक्ष), राजेंद्र ठाकरे (शिवसेना उपतालुका प्रमुख), विनय(पप्पु)भावे, (गटनेते), नगरसेवक वासू चौधरी, विजय महाजन, पारेराव बापू, भागवत चौधरी, सुरेश महाजन, नंदकिशोर पाटील, जितेंद्र धनगर, बुट्या पाटिल, हेमंत चौधरी, रवींद्र जाधव, गोपाल चौधरी, बबलू चौधरी, विशाल चौधरी पालकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असून सोबत पालकांचा ही सत्कार करण्यात आला आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिवसेना उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन विनोद रोकडे यांनी केले आणि आभार अरविंद चौधरी यांनी मानले.