संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या; शिवसेनेची मागणी

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाला तीन महिने पूर्ण झाले असून, या हत्याकांडातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी जामनेर तालुका शिवसेना (शिंदे गट) तर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जामनेर पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांना लेखी निवेदन सादर केले.

या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, तालुकाप्रमुख एड. भरत पवार, जामनेरचे नरेंद्र धुमाळ, प्रवीण ठाकरे, सचिन सोनार, कुशल पवार, नितीन राजनकर, सुरेश शेवाळ, कृष्ण सोनार, अनिल पिठोडे आणि दीपक डिवरे उपस्थित होते. त्यांनी संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली.

संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. आरोपींच्या विकृत मानसिकतेचे दर्शक असलेले काही धक्कादायक फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर न्यायालयीन प्रक्रियेतून फाशीची शिक्षा व्हावी, अशी शिवसेनेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.

Protected Content