सावदा ता. रावेर प्रतिनिधी | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाच्या शपथ विधी आज गुरूवार २८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता शिवतीर्थ मुंबई येथे सुरू होताच फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सावदा येथील बस स्टँड समोरील दुर्गामाता मंदिर समोर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून आतषबाजी करत जल्लोष केला. शिवसैनिकांनी इंदिरा कॉग्रेस, राष्ट्रवादी कार्यकर्ते एकत्र येऊन एकत्र येऊन पेढे वाटप केले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख मिलिंद पाटील, रावेर तालुका उपप्रमुख शामकांत पाटील, माजी नगरसेवक लाला चौधरी, शरद भारंबे, युवा सेनेचे सूरज परदेशी, अल्काताई पाटील, भारत नेहते, डिगा महाजन, फिरोज लेफ्टी, नगरसेवक फिरोज खान, सिद्धर्थ बडगे, सपन परदेशी, मंगेश माळी, भास्कर बोंडे, कुशल जावळे, मनोज माळी, अभिजात मिटकर, लक्ष्मण पाटील, नीरज सोनवणे, नितीन सपकाळे, चेतन माळी, संतोष मावळे, गौरव भंगाळे, मोहन पाटील, राजेश बेंडाळे, राजू रवींद्र बेंडाळे, अनिल लोखंडे, शेख झालेलं, इरफान,शाहरुख, शेख शकील हवालदार, नाजीम, शब्बीर, अभय पाटील, अक्षय विनते उपस्थित होते.