भुसावळ प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख ना. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागात तळवेल येथे “शिवसंपर्क अभियानाचा” शुभारंभ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या शुभहस्ते व उपजिल्हा संघटक विलास मुळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
तळवेल येथील शिवसैनिकांशी संवाद साधत त्यांनी शिवसंपर्क अभियान अंतर्गत राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने केलेले काम सांगण्याची संधी या माध्यमातून शिवसैनिकांना मिळाली आहे. शिवसैनिकांनी हे अभियान प्रभावीपणे राबवावे असे आवाहन जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी केले. उपस्थित शिवसैनिकांना शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक धिरज पाटील, जिल्हापरिषद सदस्या सरला कोळी, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, हिरामण पाटील, उपतालुका संघटक प्रकाश कोळी, भुसावळ शहरप्रमुख निलेश महाजन, उपसरपंच विलास भारसके, अल्पसंख्याक आघाडीचे उपजिल्हा संघटक सईद मुल्ला, दर्यापूर माजी सरपंच सुनील कोळी, ग्रा.प. सदस्य किशोर कोळी, भुरा धरणे व मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा केला सत्कार
तळवेल येथील नेहरू विद्या मंदिर शाळेतील इयत्ता १० मध्ये चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वेदांत पाटील, निसर्गा पाटील, मोनाली पाटील, संकेत कोळी, संकेत सुरवाडे यांना सत्काररुपी रोख रक्कम शिवसेनेतर्फे देण्यात आली. बैठकीला पदाधिकाऱ्यांनी उत्सफुर्तपणे प्रतीसाद दिला व गावातील विकास कामांच्या अडीअडचणी बोलुन दाखविल्या व आम्हाला वेळोवेळी वरीष्ठ पदाधिकाऱ्यांनी लागणारी मदत व विकासकामांसाठी पाठपुरावे करणे गरजेचं असल्याचे या बैठकीत नागरीकांनी बोलुन दाखविले.