बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेनेनं बाहेर पडावे यासाठी बुलडाण्यातील शिवसैनिकांनी शहरात जोरदार घोषणाबाजी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आघाडीतून बाहेर पडण्यासाठी विनंती केली आहे.
शिवसेनेचे नेते तथा कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील ४० पेक्षा जास्त आमदारांनी नाराज होऊन बंड पुकारला आहे. हे सर्व आमदार गुवाहाटी येथील एका हॉटेलात थांबले असून यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील आमदार संजय गायकवाड आणि आमदार संजय रायमुलकर या शिवसेना आमदारांचा देखील समावेश आहे.
यापैकी आमदार संजय गायकवाड यांनी ऑनलाईन पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा घेऊन जोरदार घोषणाबाजी केलीय. यामध्ये महाविकास आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडण्याची मागणी करण्यात आली आहे.
शिवसेनेचे पदाधिकारीसह कार्यकर्ते, शिवसैनिक बाळासाहेबांचा फोटो घेऊन रस्त्यावर जरी उतरले असेल तरी ते बंडखोर आमदार संजय गायकवाड यांचे समर्थक होते. बुलडाणा विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते.