Home Cities पारोळा ‘छावा’ चित्रपट करमुक्त करण्याची शिवप्रेमींची मागणी

‘छावा’ चित्रपट करमुक्त करण्याची शिवप्रेमींची मागणी


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘छावा’ चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि शिवप्रेमींनी केली आहे. याबाबत निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, “छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनगाथेवर आधारित ‘छावा’ चित्रपट मोठ्या दिमाखात प्रदर्शित झाला आहे. राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रप्रेम, स्वराज्यप्रेम, धर्मप्रेम आणि त्यागाचे प्रतीक म्हणजे छत्रपती संभाजीराजे. त्यांच्या पराक्रमावर, योगदानावर, शौर्यावर आणि बलिदाणावर आधारित हा चित्रपट लहानथोरांना व अधिकाधिक प्रेक्षकांना पाहता यावा यासाठी तो करमुक्त करावा.”

या मागणीसाठी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि शिवप्रेमींनी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे. निवेदन देतेवेळी अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.


Protected Content

Play sound