जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी ना. गिरीश महाजन यांची निवड करण्यात आली आहे. शिवजयंती महोत्सवाचे कार्यक्रम 9 दिवस साजरे करण्यात येणार आहेत. या समितीत उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, कार्याध्यक्ष डॉ. प्रताप जाधव, सचिवपदी राम पवार, कोषाध्यक्षपदी खुशाल चव्हाण तर समनव्यकपदी शंभू पाटील यांची निवड करण्यात आली आहे. रयतेचे राज्य या संकल्पनेतून जळगावमध्ये सर्व जाती धर्मांना व सर्व राजकीय पक्षांना सोबत घेवून सामाजिक सलोखा बंधुत्व यांचा आदर्श ठेवत 10 ते 19 फेब्रुवारी असा 9 दिवस शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
समितीच्या कार्यकारी सदस्यपदी नंदकुमार बेंडाळे डीडी बच्छाव जीके चव्हाण रवी देशमुख अडवोकेट विजय पाटील ज्योती चव्हाण श्रीराम पाटील सुशील नवाल प्रतिभा शिंदे गफ्फार मलिक कैलास सोनवणे ललित कोल्हे जयश्री देशमुख दीपक पालक अनंत जोशी सुकानु समिती मध्ये करीम सालार, आबा कापसे, एकनाथ देशमुख, सुरेश पाटील, विनोद देशमुख, हिरेश कदम, मनोज पाटील, प्रकाश पाटील, दीपक सुयवशी, भीमराव मराठे,प्रमोद पाटील, फारुख शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या महोत्सवात 10 फेब्रुवारीला चित्रकला स्पर्धा व रंगभरण स्पर्धा होतील. 19 तारखेपर्यंत पोवाडे, निबंधस्पर्धा, महिलांची स्कूटर रॅली, बुलेट रॅली अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमपासून या रॅली निघतील.
मिरवणुकीत लोककल्याणकारी राजा ही संकल्पना साकारण्यात येणार आहे. जिवंत देखावे, आकर्षक चित्ररथ, आदिवासी नृत्य अशी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.