शिरसोली प्रतिनिधी । शिरसोली प्र.बो. गावात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे युवा नेते विशाल देवकर यांच्याहस्ते इतर मान्यंवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्री हनुमान मंदिरात नारळ वाढवत प्रचाराच्या शुभारंभ करण्यात आला. गावातील जेष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी, ग्रामस्थांशी सवांद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि विकासासाठी परिवर्तन करत राष्ट्रवादी आघाडीला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यांची होती उपस्थिती
प्रचारात सोबत माजी सरपंच कौतिक ठाकुर, सरपंचपती रामा भिल, उपसरपंचपती श्रीराम ताडे, सदस्य अॅड. विजय बारी, प्रदिप बापू पाटील, अर्जुन पवार, इबादादा मणियार, कालू मेंबर, शशिकांत (श्याम) अस्वार, आबा पाटील, आण्णा उंबरकर, रामभाऊ वराडे, राजू ताडे, संजू अंस्वार, सोनू बारी, अनिल पाटील यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.