औदयोगिक विकासासह रोजगार निर्मितीसाठी कटिबध्द – गुलाबराव देवकर

Devkar

जळगाव प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आज शहरातील तांबापूर, मेहरूण परिसर, शिरसोली नाका परिसर, गवळी वाडा, मास्टर कॉलनी, औद्योगिक वसाहत मागील कॉलनी भागात प्रचार रॅलीद्वारे शहरवासीयांना राष्ट्रवादी आघाडीस सहकार्य करण्याचे आवाहन केले.

 

प्रारंभी ईच्छा देवी मंदिरात पूजा करत नारळ वाढवत आशिर्वाद घेत ढोल ताश्याच्या गजरात या प्रचार व सवांद रॅलीस सुरुवात झाली. प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी स्वागत तर महिला भगीनींकडून औक्षण करण्यात आले. शहराच्या सार्वागीण विकासासाठी आज परिवर्तनाची गरज आहे. आपणास संधी मिळाल्यास नागरी सेवा सुविधा सोबतच विविध औद्योगिक प्रकल्पाला चालना देत रोजगार निर्मितीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन प्रचारादरम्यान शहरवासियाना दिले. यावर सर्वांनी आपल्या हक्कांच्या उमेदवार म्हणून परिवर्तनाचे आश्वासन दिले. सोबत राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फारभाई मलिक, युवक महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, लिगल सेल जिल्हाध्यक्ष अॅड. सचिन पाटील अमोल सोनवणे, धवल पाटील, भूषण सोनवणे, रितेश लाड वंजारी, सलमान खाटीक, प्रशांत सोनवणे, सागर तायडे, ईरफान पिंजारी, तोसिब बागवान, शाहरूख बागवान यांच्यासह राष्ट्रवादी, कॉग्रेस, रिपाई आघाडीचे विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थिती होते.

Add Comment

Protected Content