अमळनेर प्रतिनिधी । येथील नगरपरिषदेत अपात्र ठरलेल्या २२ नगरसेवकांसोबत उपनगराध्यक्ष देखील अपात्र असल्याचा निर्णय संबधित प्राधिकरणाने दिला असल्याने रिक्त झालेल्या जागांसाठी तातडीने निवडणूक घेण्याची मागणी आ. शिरीषदादा मित्र परिवाराने केली आहे.

आ. शिरीषदादा मित्र परिवाराने जिल्हाधिकार्यांना एक निवेदन दिले आहे. यात नमूद करण्यात आले आहे की, अमळनेर नगर परिषदेतील सत्ताधारी असलेल्या माजी आमदार साहेबराव पाटील तसेच नगराध्यक्षा व त्यांच्या कंपूने स्वतःच्या धनाढ्य व्यापारी समर्थक व कार्यकर्ते यांचे बेकायदेशीर केलेले अतिक्रमीत बांधकामांना अभय देण्याकरीता ११ एप्रिल १७ च्या स्थायी समितीच्या व १५ एप्रिलच्या विशेष सभेत बेकायदेशीर ठराव केला होता. यात सर्वसामान्य गरीबांचे रहिवासी अतिक्रमण काढण्याचा व धनदांडग्यांचे व्यापारी अतिक्रमण कायदा व सुव्यवस्थाचे कारण दाखवून न काढण्याचा ठराव केला होता. त्यामुळे आ.शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीने पदाचा दुरूपयोग करणार्या नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षासह २२ नगरसेवकांना अपात्र करण्याविषयीची याचिका जिल्हाधिकार्यांकडे दाखल केली होती. त्यावर पुर्ण सुनावणी.जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांचेकडे होऊन त्यांनी दि.२९ जानेवारी १८ रोजी नगराध्यक्षांसह २२ नगरसेवकांना अपात्र घोषित केले होते. मध्यंतरीच्या काळात संबंधीतांनी स्वतःचे पद वाचविण्यासाठी भाजप मध्ये प्रवेश घेतल्यामुळे राजकीय दबावात राज्यमंत्र्यांनी जिल्हाधिकार्यांचा निकाल रद्दबातल करून २२ नगरसेवकांविषयी अभ्यासपूर्वक पुनर्विचार करून लोकनियुक्त नगराध्यक्षांचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्याचा आदेश दिला होता. त्या निर्णायाविरूद्ध विरोधी गटनेते प्रवीण पाठक तसेच सलीम टोपी व सविता संदानशिव यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने नगरसेवकांचे प्रकरण जिल्हाधिकारी यांचे कडे पाठवुन नगराध्यक्षांचे विषयावर निर्णय १२ जूनपर्यंत प्रलंबित ठेवला होता. .उच्च न्यायालयाच्या आदेशाने या २२ नगरसेवकांविरूध्दची याचिकेवर पुन्हा जिल्हाधिकार्यांसमोर सविस्तर सुनावणी जाली. यात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी या २२नगरसेवकांना पुन्हा दुसर्यांदा अपात्र घोषीत केले आहे. त्यात अमळनेर नगर परिषद चे उपनगराध्यक्ष यांचाही समावेश आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, त्या २२ नगरसेवकांना नगरविकास राज्यमंत्री यांनी अजुन दिलासा दिला नाही. अमळनेर नगर परिषदचे उपनगराध्यपद सध्या रिक्त असल्याने नवीन उपनगराध्यक्षांची निवड करण्यात यावी. त्या निवडणुकीकरीता बोलवाव्या लागणार्या विशेष सभेकरीता लागणारे संख्याबळ आ शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडी कडे असल्यामुळे आता लवकरच अमळनेर नगरपरिषदे वर नामदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आमदार शिरीषदादा चौधरी तसेंच कुशल मार्गदर्शक डॉ रविंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरीषदादा चौधरी मित्र परिवाराचा उपनगराध्यक्ष होणार असल्याचे यात म्हटले आहे. तसेच धनदांडग्या समर्थकांना वाचविण्यासाठी बेकायदेशीर ठराव करून जनतेने विश्वासाने दिलेल्या पदाचा दुरूपयोग करण्यार्या लोकनियुक्त नगराध्यक्षांना देखील उच्च न्यायालय व राज्यमंत्री लवकरच अपात्र ठरवतील अशी अपेक्षा आ शिरीष चौधरींसह आ. शिरीषदादा चौधरी मित्र परिवाराला असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर आ. शिरीषदादा चौधरी मित्रमंडळ आघाडीचे गटनेते प्रवीण पाठक यांची स्वाक्षरी आहे.


