Home Cities अमळनेर अमळनेर येथे आ. शिरीष चौधरी यांनी घेतले मतदारांचे आशीर्वाद

अमळनेर येथे आ. शिरीष चौधरी यांनी घेतले मतदारांचे आशीर्वाद


aa. shirish chaudhari amalner

अमळनेर, प्रतिनिधी | येथील विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शिरीष चौधरी यांनी ग्रामीण भागात जोरदार प्रचाराला प्रारंभ केला आहे. गावागावात त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठींबा लाभत आहे. गुरुवारी त्यांनी तालुक्यातील धार, मालपूर, धानोरा, मारवड, गोवर्धन, बोरगाव या गावांचा दौरा केला व ज्येष्ठ मतदारांचे आशीर्वाद घेतले.

 

लोकांनी विश्वास आणि सहकार्य ठेवल्यानेच गेल्या पाच वर्षात मतदार संघात विकासकामे झाली असून यापुढेही गावागावात आणखी विकास साधायचा असेल तर मतदारांनी आशीर्वाद पाठीशी असू द्यावे, अशी भावना आ. चौधरी यांनी या प्रचार भेटीदरम्यान व्यक्त केली.


Protected Content

Play sound