फैजपूर (प्रतिनिधी) रावेर मतदार संघातून विधानसभा निवडणूक जिंकणारे आमदार शिरीषदादा चौधरी यांना मंत्रीपद मिळावे, यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी दिल्लीत भेटीगाठी सुरु केल्या आहेत. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील हे शिरीषदांदाच्या मंत्रीपदासाठी विशेष प्रयत्न करताय.
आमदार शिरीषदादा चौधरी यांना मंत्रीपद मिळावे म्हणून नुकतीच प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे कॅबीनेट मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्याशी प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी चर्चा केली. जळगाव जिल्ह्याला मंत्रीपद मिळाल्यास कॉंग्रेस बळकट होण्यास मदत मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त करण्यात आली. यावेळी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे देखील उपस्थित होते.