Home क्राईम शिरसमणी येथे बंद घर फोडले; ९७ हजारांची रोकड लांबविली

शिरसमणी येथे बंद घर फोडले; ९७ हजारांची रोकड लांबविली

0
61
gharfodi
gharfodi

 

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसमणी येथे घराचे कुलूप तोडून घरातून ९७ हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, संभाजी शिवाजी पाटील रा. शिरसमणी ता. पारोळा हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २५ डिसेंबर रोजी रात्री ११ ते २६ डिसेंब रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान घरातील सर्वजण झोपलेले असतांना अज्ञात चोरट्याने घराचे लॉक तोडून आत प्रवेश करत घरातील ९७ हजार रूपयांची रोकड चोरून नेले. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात संभाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय भोई करीत आहे.


Protected Content

Play sound