जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काही लोकांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहे. जळगाव शहरासाठी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ना. गुलाबराव पाटील यांनी भरीव निधी मिळवून दिला. यात ६१ कोटी रूपयांचा निधी मिळाला असतांनाही महापौर, उपमहापौरांसह इतर पदाधिकारी आरोप करत असल्याची बाब दुटप्पीपणाची असल्याची टीका आज शिंदे गटातर्फे करण्यात आली.
आज गुरुवार, दि. २२ डिसेंबर रोजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, निलेश पाटील, शोभाताई चौधरी आदींनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या पदाधिकार्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. यात त्यांनी, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काही लोकांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहे. विकास कामांच्या कोणत्याही घोषणा मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी केल्या नसल्याचा दावा यात करण्यात आला मात्र तो सपशेल खोटा असून शिंदे साहेबांनी जळगांव जिल्ह्यासाठी मोठया प्रमाणात यापूर्वीच निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
मुक्ताईनगरमध्ये एमआयडीसी बाबत प्रक्रिया सुरु असून ती लवकरच कार्यान्वित करण्यात येईल. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे. या सोबत मुक्ताईनगर तालुक्याच्या संदर्भात कोणतेही विकास कामे असो; त्यासाठी तात्काळ मंजुरी देण्यात येईल. असे आश्वासन देण्यात आले आहे. कोळी समाजाच्या जातीच्या प्रमाणपत्रासाठी नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत मुख्यमंत्री शिंदे आहे साहेबांनी दखल घेतली असून त्या संदर्भातील जाचक अटी याबाबत मंत्री मंडळात प्रस्ताव कार्यान्वित करण्यात येणार आहे. धनगर समाजातील मेंढपाळ याच्यावर दाखल गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून देण्यात आले आहे.
जळगांव शहाराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. यासोबत शहरातील असलेल्या समस्यांबाबत आढावा या पूर्वीच तत्कालीन नगरविकास मंत्री व आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. १०० कोटी मधील ४२ कोटीच्या निधी या पूर्वीच शहर विकासासाठी देण्यात आला आहे. असे असताना विरोधकांकडून चुकीच्या पद्धतीने कोणत्याही विकास कामांसदर्भात खोटारडा आरोप केला जात आहे. सत्ता गेल्याने विरोधकांना विरोधाशिवाय कोणतेही काम शिल्लक राहिलेले नाही. सत्ता गेल्याचा मनस्ताप विरोधकांच्या मनात असल्याने बिनबुडाचा आरोप करीत” असल्याचे शिंदे गटातर्फे सांगण्यात आले.
पुढे पत्रकारांशी संवाद साधतांना “मुक्ताईनगर येथे एम.आय.डी.सी होण्यासाठी घोषणा शिवसेनेचे म्हणणे की धरणगांवचे रेस्ट हाऊस पाळधीत केले असा आरोप यांनी केला हा आरोप चुकीचा आहे. वास्तविक २०१८ ते १९ मध्ये पाळधीचा शासकीय विश्राम गृह प्रस्ताव प्रलंबित होता म्हणून तो मंजूर झाला. आणि धरणगांव विश्राम गृह २०२१ चा प्रस्ताव प्रलंबित आहे.
शिवसेनेकडून पाळधी गेस्ट हाऊस बाबत चुकीच्या पद्धतीने माहिती पसरवली जात आहे मात्र २०१७ व १८ मध्येच यांसदर्भात पाठपुरावा तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून करण्यात आला होता, पाळधी ते शासकीय वस्तीगृह प्रलंबित असल्यामुळे त्यांचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून करण्यात आले मात्र धरणगांव येथे देखील शासकीय वस्तीगृहाची उभारणी करण्यात येणार आहे. ते प्रकरण मंत्रालयात स्तरावर प्रस्तावित करण्यात आले आहे; मात्र शिवसेनकडून याबाबत चुकीची माहिती नागरिकांमध्ये पसरवली जात आहे.
धरणगाव वासियांचा सर्वाधिक ज्वलंत पाण्याच्या विषयासंदर्भात राज्य मंत्रिमंडळात कोट्यावधीची पाणी योजना मंजूर करण्यात आली. या पाईपलाईन योजनेच्या माध्यमातून समस्त धरणगांव वासियांची पाण्याची समस्या सुटणार असून मोठा दिलासा या माध्यमातून मिळणार आहे.” असे शिंदे गटातर्फे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
याप्रसंगी ॲड दिलीप पोकळे, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, रेश्मा काळे, प्रतिभा देशमुख, सरीता नेरकर, सरिता कोल्हे, शोभा चौधरी, मनोज चौधरी, स्वप्निल परदेशी, सागर सैंदाणे, गिरीश सपकाळे, चेतन कापसे, भुषण वाडे, पवन म्हस्के, बजरंग कोळी यांच्यासह आदी उपस्थित होते.