शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेतर्फे विभागीय पुरस्कार जाहिर

पाचोरा प्रतिनिधी । शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेतर्फे विभागीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असून येत्या रविवारी २८ नोव्हेंबर २०२१ रोजी  “मराठा भवन-निवृत्तीनगर” जळगाव येथे विभागीय आदर्श शिक्षक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

 

यामध्ये धुळे, जळगाव आणि नंदुरबार या तीनही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकास “महात्मा फुले आदर्श शिक्षक” पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय अध्यक्ष प्रेमचंद अहिरराव, जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश देशमुख जिल्हा सचिव प्रवीण सनेर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. महात्मा जोतीराव फुले स्मृती दिनानिमित्त शिक्षणमहर्षी डाॕ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन या पुरस्कारार्थी शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

 

यात जळगाव जिल्ह्यातील तालुकानिहाय शिक्षक याप्रमाणे- दिपाली बुवा (पारोळा), प्रज्ञा माळी (एरंडोल), शेख निजामुद्दीन (धरणगाव), प्रवीण खरे (बोदवड), आशा महाजन (अमळनेर), राहुल पाटील (चोपडा), वैशाली घोंगडे (जामनेर), किशोर चौधरी (यावल), विठोबा वाघ (रावेर), वैशाली सोळंके (एरंडोल), संदीप पाटील (भुसावळ), शालिनी सोमकुवर (मुक्ताईनगर), मुकेश पाटील (जळगाव), स्वाती पाटील (पाचोरा), ईश्वर पाटील (भडगाव), शर्मिला खैरनार (चाळीसगाव), धुळे जिल्ह्यातील तालुकानिहाय शिक्षक याप्रमाणे – राकेश पाटील (शिंदखेडा), दत्तू पाटील (शिरपूर), गोकुळ पाटील (धुळे), सुषमा भामरे (साक्री) तर नंदुरबार जिल्ह्यातील तालुकानिहाय शिक्षक याप्रमाणे – मोहिनी कापडणीस (नंदुरबार), प्रकाश माळी (नवापूर), रवींद्र मुजगे (तळोदा), रतनसिंग वसावे (अक्कलकुवा), रमेश नुक्ते (धडगाव), पृथ्वीराज राजपूत  (शहादा) या शिक्षकांचा समावेश आहे.

Protected Content