यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील शीफा राजीव तडवी या विद्यार्थिनीने ऑल इंडिया रोलर स्पीड स्टेकिंग स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त केले आहे.
नागपुर येथील गायकवाड पाटील इंटरनॅशनल च्या स्कुल एम.एस.धोनी अकॅडमीतर्फे ऑल इंडिया रोलर स्पीड स्टेकिंग स्पर्धा २०२२ हि स्पर्धा तीन विभागात घेण्यात आली. या स्पर्धेत यावल येथील आदीवासी तडवी भिल एकता मंचचे प्रदेशाध्यक्ष एम.बी.तडवी यांची नात शिफा तडवी तिन्ही विभागातून यशस्वी ठरली असून तिने तीन कास्यपदक प्राप्त केले आहेत.
शीफा तडवी हिने यापूर्वी जिल्ह्यातून भुसावळ येथील सिल्वर लाईन स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे प्रशिक्षण घेत सहभाग नोंद्वत २३,२४ एप्रिल दरम्यान रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे झालेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले होते. प्रशिक्षक दिपेश सोनार, पियुष दाभाडे यांनी मार्गदशन केले. आदिवासी कुटुंबातील शीफा तडवी हि डॉ. फिरोज तडवी यांची पुतणी तर सरकारी वकील राजीव तडवी यांची कन्या आहे. तिने मिळवलेल्या यशानिमित्त सर्वच स्तरातून तीचे अभिनंदन केले आहे.