Home Cities जळगाव शेठ ला.ना.सा. विद्यालयात श्री समर्थ रामदास नवमी निमित्त कार्यक्रम

शेठ ला.ना.सा. विद्यालयात श्री समर्थ रामदास नवमी निमित्त कार्यक्रम

0
137

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना.सा. विद्यालयात शनिवार २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ९ दरम्यान श्री समर्थ रामदास नवमीचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे, ज्येष्ठ शिक्षिका आशा कुलकर्णी, मोहिनी कुलकर्णी, ज्येष्ठ शिक्षक जगदीश साळुंखे, सोमनाथ महाजन यांच्याहस्ते विद्येची देवता सरस्वती माता व श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.

याप्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका प्राजक्ता गोहिल व संगीता पानट यांनी समर्थ रामदास लिखित श्लोकांचे पठण व अर्थ विवेचन विद्यार्थ्यांकडून करून घेतले. तसेच आशा कुलकर्णी व मोहिनी कुलकर्णी यांनी श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या आध्यात्मिक कार्याची माहिती सांगून विद्यार्थ्यांनी सदाचाराने वागण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ शिक्षिका अमला पिंपळे मॅडम व पद्मजा जोशी यांनी विद्यार्थ्यांकडून रामरक्षा स्तोत्राचे पठण करून घेतले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षिका मंगला भारुळे मॅडम यांनी सुंदर प्रार्थना सादर केली.

ज्येष्ठ पर्यवेक्षक तथा कार्यक्रम अध्यक्ष संजय वानखेडे यांनी मनाच्या श्लोकातील वचनाप्रमाणे विद्यार्थ्यांनी वर्तणूक करण्याचे व चांगला नागरिक होऊन देशसेवा करण्याचे आवाहन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक संजय भारुळे, पर्यवेक्षक प्रशांत जगताप, संजय वानखेडे, सोमनाथ महाजन, जगदीश साळुंखे, उमेश ढाकणे, बापू सोनगीरे , किशोर माळी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी प्रचंड यांनी तर आभार प्रदर्शन पद्मजा जोशी यांनी केले.


Protected Content

Play sound