जळगाव प्रतिनिधी । दारूच्या नशेत मोबाईलवर बोलत असतांना आईसमोर तरूणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, सुरेश नथ्थू पाटील यांचे कळगाव रस्त्यावरील जळगाव खुर्द शेतशिवारात जितेन सुकराम ठाकुर (वय-25) रा. चिरीया, मध्यप्रदेशगेल्या 15 वर्षांपासून आई, भाऊ सोबत शेतातच वास्तव्यास होता. रविवारी शेताच्या कामाला सुटी असल्याने सुरेश पाटील यांनी मजूरांचा पगार (मजूरी) देवून टाकली होती. त्यानंतर सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास जितेन ठाकूर हा दारू पिऊन आला होता. त्यावेळी आई घरासमोर खाट टाकून बसली होती. जितेन ठाकूर हा फोनवर बोलत असतांना शेतातील विहिरीकडे निघाला. त्यावेळी त्याची आई भुलाबाई हिचे लक्ष होतो. दरम्यान, अचानक त्यांने शेतातील 20 फुट खोल विहीरात उडी मारली. मुलाने विहीरीत घेतली हे आईच्या लक्षात आल्याने तिने आरडाओरड केली. यात डोक्याला गंभीर जखम झाल्याने जितेनचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह बाहेर काढला. मात्र आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच्या पश्चात आई, तीन भाऊ असा परीवार आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.