शेंदुर्णी, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील तीन टोळ्यांमधील १८ उपद्रवींना पोलीस प्रशासनाने सहा महिन्यांसाठी हद्दपार केले आहे.
शेंदुर्णीत अनेकदा लहान-मोठ्या घटनांवरून तणाव निर्माण होत असतात. या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे. या अनुषंगाने येथील १८ उपद्रवींना सहा महिन्यांसाठी जामनेर, पाचोरा व सोयगाव तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी बुधवारी आदेश काढले. पहूर पोलिस स्टेशनला आदेश प्राप्त होताच संबंधितांवर कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी दिली.
शेंदुर्णी गावातील तीन टोळ्यांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करूनही त्यांचा उपद्रव थांबला नाही. त्यामुळे पोलीस निरीक्षक इंगळे, गोपनीय शाखेचे गोपाळ माळी व विनय सानप यांनी प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षकांकडे सादर केला होता. अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे व डीवायएसपी भारत काकडे यांनी पडताळणी करून अहवाल सादर केला होता. पहूर पोलिस स्टेशनला आदेश प्राप्त होताच संबंधितांवर कारवाई करण्यात आली.
दरम्यान, हद्दपार करण्यात आलेल्या उपद्रवींमध्ये बाशिद खाटीक, वसीम खाटीक, रिहान खाटीक, मुराद शकील खाटीक, हमीद दादामियॉं खाटीक, नईम उर्फ नमा कादर खाटीक, इस्त्रायल कादर खाटीक, अमीन कादर खाटीक, सादीक युसुफ खाटीक, अमोल मोरे ,कृष्णा भावसार, सचिन धनगर, अविनाश प्रकाश धनगर, सागर ज्ञानेश्वर पाटील, सागर सुभाष ढगे, शुभम गुजर, शरद बारी, अफसर खाटीक यांचा समावेश आहे.