इकरा महाविद्यालयाचे पहिले कर्मचारी शेख कामिल सेवानिवृत्त

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | इकरा शिक्षण संस्था संचलित एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालय, मेहरून जळगाव येथील शेख कामिल शेख नजीर हे 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर 31 मार्च 2025 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या समर्पित सेवेसाठी महाविद्यालयाच्या वतीने तसेच इकरा शिक्षण संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

शेख कामिल यांनी 1991 साली संस्थेत प्रवेश केला आणि महाविद्यालयाचे पहिले कर्मचारी म्हणून योगदान दिले. ते एरंडोल येथून आले होते आणि त्यांच्या मेहुण्याने डॉ. अब्दुल करीम सालार यांची भेट घडवून आणल्यानंतर त्यांना या संस्थेत सेवा करण्याची संधी मिळाली. आपल्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची मने जिंकली. सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवर्ग आणि कर्मचारी यांनी त्यांच्या कार्याची आठवण काढली आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Protected Content