जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | इकरा शिक्षण संस्थेच्या अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या एच. जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, मेहरून, जळगाव येथील एफ. वाय. बी.एस.सी. मधील विद्यार्थिनी शेख बुशरा नाज मुनाफ हिने जिल्हा स्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत तिच्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल तिला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
ही स्पर्धा अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ, एस. एन. डी. टी. महिला महाविद्यालय, जळगाव यांनी आयोजित केली होती. या यशाचे श्रेय महाविद्यालयाच्या हिंदी विभागाचे अध्यक्ष डॉ. राजेश भामरे यांना दिले जात आहे. इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ अब्दुल करीम सालार व सदस्य, तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. चांद खान व संपूर्ण स्टाफने तिला यशस्वी कामगिरीबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन दिले.