बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेगावहून शिर्डीकडे निघालेल्या बसचा नांदुरा व मलकापूर दरम्यान तांदुळवाडी जवळ अपघात झाल्याची घटना सकाळी घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
याबाबत अधिक असे की, राज्यभरात सध्या सर्वत्र पावसाने थैमान घातले आहे. आणि यामुळे रस्ते हे निसरडे झाले आहे. सोमवारी सकाळी शेगावहून शिर्डी कडे जाणाऱ्या एसटी बसला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर अपघात झाल्याचे वृत्त आहे. नांदुरा मलकापूर दरम्यान तांदुळवाडी या गावाजवळ या बसला अपघात झाल्याची प्रार्थमिक माहिती समोर आली आहे .या अपघातात एकूण सहा प्रवासी जखमी झाली असून कोणतीही जीवित हानी झाल्या नसल्याचे समोर आले आहे. तर तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारा करता भरती करण्यात आले आहे. प्रार्थमिक अंदाजानुसार पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावर बसून ती पलटली असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळतात पोलिसांचा एक पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. एकंदरीत संततधार पाऊस आणि रस्त्यावर झालेला चिखल आणि त्यामुळे आता दळणवळण देखील अपघातात रूपांतर होत असून अशा वातावरणात वाहने सावकाश चालवणे आवश्यक झाले आहे.