शेगाव अमोल सराफ । संतनगरी शेगाव येथे गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन नववर्षाचा शुभप्रारंभ करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येथे आले आहेत. यात राज्याच्या कान्याकोपर्यातून येणार्या अनेक पालख्यांचाही समावेश आहे. आज नवीन वर्षाच्या पहिल्याच वर्षी शेगाव नगरीत भक्तीचा मळा फुलल्याचे दिसून येत आहे.
विदर्भची पंढरी म्हणूंन ओळख असलेल्या संत नगरी शेगाव येथे नववर्षानिमित आज पहिला दिवस श्री संत गजानन महाराज यांचा दर्शनाने सुरवात करण्या करीता संपूर्ण राज्यातून मोठ्या संखेन भाविक शेगावमध्ये दाखल झाले. आज सकाळपासून लांबच्या -लांब रांगा श्रीचा दर्शना करीता दिसून येत होत्या. विशेष म्हणजे या नववर्षाकरीता मंदीर प्रशासनातील सेवाधारी मडळी मंदीर विश्वस्तानचा मार्गदर्शनाखाली सज्ज होते. भाविकान दर्शना करीता नियोजित दर्शन व्यवस्था करण्यात आली होती.
आज सकाळी आढावा घेतला असता जवळपास तबल 2 तास नंतर भूयारातील श्रीचं भाविकांचे दर्शन होत होते. या संपूर्ण वेळी भाविक ‘गण गण गणतात बोतेय’चा जप करीत होते. नववर्ष लाखो भाविक शिस्त-बद्ध नियोजन यामुळे दर्शन-वारीत भाविकांचे दर्शन लवकर होत होते. एकंदरीत नववर्षाचा दिवशी २४ तास मंदीर परिसरात भक्तांची संख्या वाढतच होती. त्यामुळे भक्तांचा सोयीसाठी दर्शनाची तसेच मंदीर प्रवेशसाठी स्वतंत्र मार्ग-व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण दिवसभर शहरामध्ये पोलीस प्रशांसनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवणायत आला होता. याचा थेट आढावा आमच्या प्रतिनिधी अमोल सराफ यांनी आज घेतला.