जळगाव प्रतिनिधी । शहारातील चौगुले प्लॉट मधीन एकाच्या तीन बकऱ्या अज्ञातांनी चोरून नेल्याप्रकरणी तीन महिन्यापुर्वी शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोन आरोपींना पकडण्यात शनीपेठ पोलीसांना यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश हिरालाल लवाणी वय 36 रा. चौगुल प्लॉट जळगाव यांच्या मालकीच्या तीन शेळ्या 1 मे 2019 रोजी रात्री 1.40 ते 1.45 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी 11 हजार रूपये किंमतीच्या तीन शेळ्या दावण कापून चोरून नेले होते. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान शनीपेठ पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत यातील दोन संशयित आरोपींना पकडण्यात यश आले. शेखर उर्फ कालु संजय भारोटे वय 20 आणि सनी राजु मिलांदे वय 20 दोन्ही रा. शनिपेठ अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्याच्या ताब्यातून अद्याप कोणताही माल जप्त केलेला नाही. दोघांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.