साकेगाव येथून चोरीच्या बुलेटसह आरोपीस अटक

bullet chori

भुसावळ प्रतिनिधी । गुजरातमधून बुलेट चोरून वापरत असणार्‍या तरूणाला एलसीबीच्या पथकाने साकेगाव येथून अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, जिल्ह्यात मोटार सायकल चोरीच्या घटना घडत असल्याने त्याबाबत पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम, स्थागुशा, जळगांव यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार एलसीबीचे पो.ना. सुरज
पाटील यांना एक व्यक्ती साकेगाव तसेच भुसावळ परिसरात चोरीची बुलेट फिरवत असल्याची माहिती मिळाली. याची खातरजमा करण्यात आल्यानंतर पथक तयार करण्यात आले. यात स.फौ. अशोक महाजन, विजयसिंग पाटील, सुनिल दामोदरे, युनुस शेख, कमलाकर बागुल, सुरज पाटील, गफूर तडवी, इद्रिस पठाण, प्रवीण हिवराळे आदींचा समावेश होता.

या पथकाने साकेगाव येथील योगेश संजय गाडीकर ( वय २३ ) या तरूणावर पाळत ठेवून त्यांस वराछा पो.स्टे. सुरत (गुजरात) भाग-५ गुरनं २८६/१८ भादंवि क. ३७९ या गुन्ह्यात चोरीस गेलेल्या १,००,०००/-रु. कि.च्या बुलेटसह साकेगांव या परिसरातून ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता, त्याने सदर बुलेट ही मी माझ्या मामांकडे सुरत येथे मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण घेत असतांना सुरत येथून दिनांक १०/८/१८ रोजी समीमेर हॉस्पीटलच्या पार्कीगमधन चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार संबंधीत पथकाने गुजरात पोलीसांशी संपर्क करुन माहिती विचारली असता, त्यांनी याला दुजोरा देऊन या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले. त्यानुसार पुढील कारवाईसाठी संबंधीत आरोपीला वराछा पोलीस स्थानकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!